लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी बदलला 'सीए'च्या अभ्यासाचा पॅटर्न; 'असा' करतायेत अभ्यास

 the students changed the study pattern of CA Due to the lockdown
the students changed the study pattern of CA Due to the lockdown
Updated on

पुणे : चार्टर्ड अकाउंटंटचा (सीए) अभ्यास म्हणला की, दिवसरात्र अभ्यास आलाच. पाच सहा तास क्लास झाला की, रुमवर किंवा अभ्यासिकेत रात्री उशिरापर्यंत अभ्यास करता येत होता. मात्र, लाॅकडाऊनमुळे 'सीए'च्या अभ्यासात अडथळे निर्माण झाले आहेत. पुस्तके पुण्यात अन् विद्यार्थी गावाकडे अशी अवस्था झाली आहे. ऑनलाईन लेक्चर, व्हिडिओ आणि पीडीएफ फाईल्स उपलब्ध झाले असले तरी त्यावरही मर्यादा येत असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'सीए'चा अभ्यास करण्यासाठी पुणे प्रमुख केंद्र आहे. दरवर्षी साधारणपणे २० ते २२ हजार विद्यार्थी नव्याने 'सीए' होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन पुण्यात दाखल होतात. यातील मोजक्या विद्यार्थ्यांना पहिल्या झटक्यात परीक्षांमध्ये यश मिळते, तर बर्याच जणांना दोन वेळा पेक्षा जास्त प्रयत्न करावा लागतो. मात्र आता लाॅकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. 

'द इस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंन्टस ऑफ इंडिया'ने  (आयसीएआय) सीएची परीक्षा कोरोनामुळे आता नोव्हेंबर मध्ये घेण्याचे ठरवले आहे. 'सीए' करणारे ९० टक्के विद्यार्थी हे बाहेरचे आहेत, लाॅकडाऊन लवकर संपेल म्हणून ते बहुतांशी पुस्तके, नोट्स पुण्यात ठेऊन गेले, पण आता चार महिने गावाकडेच असल्याने त्यांची अडचण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी 'आयसीएआय'कडे नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठी मोफत ऑनलाईन रिव्हीजन लेक्चर सुरू केले आहेत. 

कात्रज टेकडीफोड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 'असा' दिला निकाल;प्रशासनाने म्हणणेच मांडले नाही

'आयसीएआय' पुणे शाखेच्या माजी अध्यक्षा सीए ऋता चितळे म्हणाल्या, "पुण्यात 'आयसीएआय'च्या क्लास सीएचे ३० पेक्षा जास्त क्लासेस आहेत. नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी क्लास लावतात. पण आता गावाकडे गेलेले विद्यार्थी पुन्हा पुण्यात येतील का हा प्रश्न आहेच. सध्या ऑनलाईन क्लासेसवरच विद्यार्थ्यांचा भर आहे."
पुण्यात रहाणारी अमृता खाडीलकर म्हणाली, "ऑनलाईन रिव्हीजन लेक्चर सुरू अाहेत, पण थेट शिक्षण घेण्यात मजा आहे. ऑनलाईन व्हिडिओ पाहून अभ्यास करताना एखादा भाग समजला नाही तर पुन्हा व्हिडिओ बघून समजून घ्यावे लागते. तसेच ऑनलाईनमुळे देशभरातील तज्ज्ञांचे लेक्चर ऐकायला मिळत आहेत."


"लाॅकडाऊन लवकर संपेल म्हणून थोडेच पुस्तके घेऊन गावाकडे आलो होतो, पण आता चार महिने झाले इथेच आहे. वाॅट्सअॅप, टेलिग्रामवर आलेल्या नोट्स झेरॉक्स करून अभ्यास करावा लागत आहे. लॅपटॉप नसल्याने मोबाईलवर ऑनलाईन अभ्यासाला मर्यादा येत असून, अनेकांची हीच अवस्था आहे. तरी कितीही अडचणी आल्यातरी नोव्हेंबर मध्ये इंटरमिजिएट उत्तीर्ण व्हायचे आहे."
 वैभव मठपती, विद्यार्थी, लातूर

पुणे : कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद; कारण...

- अभ्यासासिकेत १० ते १२ तास अभ्यास होत होता,
- गावाकडे आता ४ ते ५ तास तास अभ्यास
- मोठी ई पुस्तके वाचताना मर्यादा
- समजले नाही तर मित्राला विचारणे नाही कर पुन्हा व्हिडिओ बघणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com