150 व्या गांधी जयंतीनिमित्त मेल मोटारवर विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

 महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय टपाल पुणे विभागाने अभिनव उपक्रम राबवत, टपाल विभागाच्या मेल मोटार वाहनांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत गाड्यांवर 'महात्मा गांधी जयंती' ही थीम असणारे चित्रे रेखाटली

पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय टपाल पुणे विभागाने अभिनव उपक्रम राबवत, टपाल विभागाच्या मेल मोटार वाहनांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत गाड्यांवर 'महात्मा गांधी जयंती' ही थीम असणारे चित्रे रेखाटली. 

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त टपाल विभागाच्या पुणे क्षेत्रातील दहा गाड्यांवर शालेय विद्यार्थ्यांनी चित्र काढण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. रविवारी (ता.22) पुणे स्टेशन परिसरातील जनरल पोस्ट ऑफिस येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये शहरातील सुमारे 15 शांळेच्या 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेमध्ये निवासी मतीमंदी विद्यालय, सिंहगड रस्त्यावरील निवासी मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि विषेश विद्यार्थी असे विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यता आले होते. या विद्यार्थ्यांनी गाड्यावर काढलेले चित्र पुढील महिनाबर या गाड्यांवर ठेवली जाणार आहेत. 

- या शाळांनी घेतला सहभाग 
ज्ञानप्रबोधिनी शाळा 
सरस्वती विद्यालय 
मोजे विद्यालय 
सेंट जेव्हेरिअस 
गुरुकुल विद्याल 
केंद्रीय विद्यालय 
ज्ञानेश्वर विद्यालय 
आर.एन.एस. विद्यालय 
मुक्तांगण इंग्लिश स्कूल 
आर्यन वर्ड स्कूल 
वसंतदादा पाटील विद्यालय 
आदर्श शिक्षण संस्था 
दस्तून कॉ. एज्युकेशन 
निवासी मतीमंदी विद्यालय 
डॉ. जी.जी. शहा स्कूल 

 
''महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर चित्रकला स्पर्धेची थीम ठेऊन, टपाल विभागाच्या गाड्यांवर ही स्पर्धा घेण्यात आली. टपाल विभागाच्या मेटल गाड्या शहरभर फिरत असतात. त्यामुळे या गाड्यावर काढलेली चित्र शहरातील लाखो लोक पाहू शकतील ''
- निर्मला देवी, संचालक, पुणे टपाल क्षेत्र कार्यालय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students Drew pictures on postal mail motor vehicles on the Occasion of 150th Birth Anniversary of Pune