परसबागेतील भाजीपाल्याच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना स्वकमाईचे धडे बालबाजारात पालक, ग्रामस्थांची उत्स्फूर्त खरेदी

परसबागेतील भाजीपाल्याच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना स्वकमाईचे धडे बालबाजारात पालक, ग्रामस्थांची उत्स्फूर्त खरेदी

Published on

डेरेवाडीत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे

आनंदी बाजार उत्साहात; ग्रामस्थांचा खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद

आनेवाडी, ता. २ : स्वतः कष्ट करून मिळविलेल्या कमाईचा आनंद काही वेगळाच असतो. हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, मातीशी नातं घट्ट व्हावं आणि श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व उमगावे, या उद्देशाने डेरेवाडी प्राथमिक शाळेत शालेय परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. या परसबागेत विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत घेऊन पिकविलेल्या भाजीपाल्याची विक्री करत स्वकमाईचे धडे प्रत्यक्षात गिरवले.
डेरेवाडी (ता. जावळी) येथील शाळेच्या आवारात भरविण्यात आलेल्या या आनंदी बाजारात शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाची सुंदर सांगड घालण्यात आली होती. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, अशा आरोळ्यांनी चिमुकल्यांच्या आठवडी बाजाराचे चित्र उभे राहिले. शाळेतच स्वतः पिकविलेला भाजीपाला विकण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग, उत्साह आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता.
या बालबाजारात बटाटा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मुळा, गाजर, पावटा, वांगे, पालक, मेथी, चाकवत, पोकळा, राजगिरा आदी विविध प्रकारच्या भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. पालकांसह ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने खरेदी करत या उपक्रमाचा आनंद लुटला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, नफा-तोटा यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून, व्यवहारज्ञान अधिक पक्के झाले आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सुनीता कामटे, उपशिक्षक अतुल बोराटे यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
-------------------------------
चौकट

कलिंगडाची लागवड

परसबागेत कलिंगडाची लागवड करणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरण्याचा मान डेरेवाडी प्राथमिक शाळेला मिळाला आहे. शालेय आवारात गांडूळखत निर्मिती करून त्याचाच उपयोग परसबागेसाठी केला जातो. सेंद्रिय पद्धतीने उत्तम दर्जाचा भाजीपाला येथे पिकवला जात असून, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात त्याचा नियमित वापर केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः पिकविलेल्या भाजीपाल्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.
-----------------------
02313
डेरेवाडी : येथे चिमुकल्यांनी भरवलेला आठवडी बाजार. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com