आलमे येथे श्रमदानातून नव वर्षाचे स्वागत
ओतूर, ता. १ : आलमे (ता. जुन्नर) येथील ज्ञानदा शिक्षण मंडळ, नारायणगाव संचलित अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रमदान करून एक आगळावेगळा उपक्रम राबविल्याची माहिती मुख्याध्यापक भगीरथ पठारे यांनी दिली.
आलमे आश्रमशाळेकडून दरवर्षीच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवतात. यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक वनीकरण जुन्नर व माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी विकसित केलेल्या ऑक्सिजन पार्क वडज या ठिकाणी असणाऱ्या एकूण शंभर झाडांभोवती आळी व्यवस्थित केली. तसेच या झाडांच्या भोवताली वाढलेले गवत काढून त्या सर्व झाडांची पाणी घालून त्यांची तहान भागवली. या सर्व श्रमदानासाठी विद्यार्थ्यांना जुन्नर परिक्षेत्राचे सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समीर इंगळे, वनपाल मनीषा काळे, वनरक्षक रमेश खरमाळे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
या श्रमदानातून नवीन वर्षाचे स्वागत करताना सामाजिक कार्य करून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आत्मीयता वाढवल्या बद्दल संस्थेचे सचिव अमित बेनके आणि माजी आमदार अतुल बेनके यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

