Nutritional Food
sakal
सोमेश्वरनगर - शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले, मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला अजूनही शालेय पोषण आहार शाळेपर्यंत पोहोचवता आला नाही. मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस शिल्लक राहिलेला तांदूळ शाळांनी कसाबसा पुरवला. मात्र आता कुठे तेल आहे तर तांदूळ नाही किंवा हळद आहे तर जिरे-मोहरी नाही, अशी अवस्था झाली आहे. काही ठिकाणी गुरुजींवर उसनवारीने माल आणण्याची वेळ ओढवली आहे.