#JNUViolence : 'जेएनयू'ची धग पोचली पुण्यात; 'एफटीआयआय'समोर विद्यार्थ्यांची निदर्शने! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FTII

या घटनेचया निषेधार्थ 'एफटीआय'मधील विद्यार्थीयांनी रविवारी रात्रीच आंदोलन केले.

#JNUViolence : 'जेएनयू'ची धग पोचली पुण्यात; 'एफटीआयआय'समोर विद्यार्थ्यांची निदर्शने!

पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यीपाठातील (जेएनयू) हल्ल्याचे पडसाद रविवारी (ता.5) रात्रीपासूनच पुण्यात उमटले. या हल्ल्याच्या निषेधावरून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेचया निषेधार्थ 'एफटीआय'मधील विद्यार्थीयांनी रविवारी रात्रीच आंदोलन केले. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून तोडण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केल्याचा आरोप 'एनएसयूआय'ने केला; तर डाव्या संघटना जाणीवपूर्वक दहशत निर्माण करीत असल्याचे 'अभविप'चे पदाधिकारी सांगत आहेत. 

दरम्यान, 'जेएनयू'मधील हल्ल्याच्या निषेध म्हणून सोमवारी (ता.6) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायंकाळी सात वाजता निर्धार सभा घेण्यात येणार आहेत, असे 'एनएसयूआय'चे अध्यक्ष सतीश पवार यांनी कळविले आहे.

तर, डाव्या संघटनांविरोधात निषेध मोर्चा काढणार असल्याचे 'अभविप'चे दयानंद शिंदे यांनी सांगितले.

loading image
go to top