esakal | पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार व्यावसायिक शिक्षण; कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार व्यावसायिक शिक्षण; कारण...

-  सहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट

- व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण, इंग्रजी माध्यम, क्रॉप सायन्स, बँकिंग असे विविध अभ्यासक्रम सुरू

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार व्यावसायिक शिक्षण; कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सुपे : विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण, इंग्रजी माध्यम, क्रॉप सायंन्स, बँकिंग असे विविध अभ्यासक्रम सुरू करत असल्याची माहिती काऱ्हाटी (ता.बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे सचिव प्रफुल्ल तावरे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

बारामती-पुणे मार्गावर काऱ्हाटी येथे संस्थेच्या मालकीचे जमिनीचे मोठे क्षेत्र आहे. येथे संस्थेचे वसतिगृह विद्यालय असून, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंग्रजी माध्यमाची शाळा, क्रॉप सायंन्स, बँकिंग असे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे तावरे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या परिसरात सुमारे सहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत सुमारे अडीच हजार झाडे लावली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेने मान्यवरांच्या हस्ते नुकतीच १०० झाडे लावली. यात निलमोहर, भावा, ताम्हण, शिरीष, नारळ, चिकू, जांभूळ आदी झाडांचा समावेश आहे.   

वृक्षारोपणप्रसंगी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, हनुमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, भरत खैरे, राजेंद्र रायकर, सचिव प्रफुल्ल तावरे, खजिनदार सुभाष सोमाणी, दत्तात्रय वाबळे, उद्योजक सतिश ननवरे, अनिल जगताप, शिरीष लोणकर, संजय जाधव, प्राचार्य यु. एम. शिंदे, अनिल चव्हाण, विकास निर्मल, गिरीष कुंभार आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा