वाई:-द्रविड हायस्कूल मध्ये विज्ञान प्रेरणा कार्यक्रम संपन्न

वाई:-द्रविड हायस्कूल मध्ये विज्ञान प्रेरणा कार्यक्रम संपन्न

Published on

आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ

डॉ. देशपांडे; वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये विज्ञान प्रेरणा कार्यक्रम

वाई, ता. ६ : विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता व कुतूहल असते. जिज्ञासेपोटी मनात निर्माण होणारे प्रश्न विचारून, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. सी. व्ही. रमण हे पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधताना एक थोर शास्त्रज्ञ झाले. त्यामुळे आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ असू शकतो, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुण्याचे संशोधक डॉ. गुरुदास देशपांडे यांनी व्यक्त केले.
येथील द्रविड हायस्कूलच्या प्रांगणात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांचा बाह्य संपर्क कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत विज्ञान विषयाची आवड असलेल्या इयत्ता पाचवी ते नववीतील एकूण २०० विद्यार्थ्यांना विषाणू कसे व कोणामार्फत पसरतात, तसेच अँटिव्हायरस कसे तयार केले जातात, याची माहिती पीपीटीच्या माध्यमातून दिली.
या वेळी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने विषाणू कसे दिसतात हे विद्यार्थ्यांना पाहता आले.
विद्यार्थी विज्ञान मंथनचे राज्य समन्वयक मीना माळगावकर यांनी डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांची महती स्पष्ट केली.
डॉ. देशपांडे यांचा मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले यांनी सत्कार केला. नव्याने पदोन्नती झालेल्या उपमुख्याध्यापिका नेत्रा मुळे आणि पर्यवेक्षक घनश्याम नवले यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी विज्ञान मंथनचे समन्वयक व विज्ञान शिक्षक महेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक प्रतिनिधी उमेश लिमये यांनी आभार मानले. कार्यक्रमास वैज्ञानिक जैसी सी जो (एनआयव्ही, पुणे), जिल्हा समन्वयक सुनील चांदुरकर (विज्ञान भारती, पुणे) व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

------------------------------
07668
वाई : डॉ. गुरुदास देशपांडे यांचा सत्कार करताना दत्तात्रय भोसले. त्या वेळी डावीकडून घनश्याम नवले, सुनील चांदुरकर, मीना माळगावकर, जैसी सी जो, नेत्रा मुळे, उमेश लिमये.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com