Pratap Pawar : विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेतील जीवनमूल्ये आत्मसात करावी, असे मत फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. शिक्षणपद्धतीत जीवनमूल्यांचे महत्त्व कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुणे : ‘‘भारतीय परंपरेतील जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ही जीवनमूल्ये सांगण्यात आपली शिक्षणपद्धती संपूर्णपणे लंगडी ठरली आहे. कोणीही अभ्यासक्रमात सहजासहजी जीवनमूल्ये शिकवत नाहीत आणि समाजही त्याबाबत बोलत नाही.