आता विद्यार्थी म्हणतात, गाव नको, पुणचं बरं! कारण...

Students Stuck in now says that Pune is better than village
Students Stuck in now says that Pune is better than village

पुणे : 'लाॅकडाऊन'मुळे पुण्यात अडकून पडलेले विद्यार्थी मोठ्या कष्टाने गावाकडे गेले खरे, पण तेथे क्वारंटाईनची व्यवस्थित सुविधा नसल्याने शेतात नाही तर, जिल्हा परिषदेच्या शाळेत रहाण्याची वेळ आली. काहींना तर गावात प्रवेशच मिळाला नाही. असे अनुभव येत असल्याने जे गावाकडे जाऊ शकले नाहीत ते विद्यार्थ्यांनी आता पुण्यातच रहाण्याची मानसिकता तयार करून घेतली आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'मुळे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुण्यात स्पर्धा परीक्षा व इतर शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गावाकडे जाऊ शकले नाहीत. लाॅकडाऊन लवकर संपेल असे वाटले होते, मात्र, एप्रिल महिना संपला तरीही विद्यार्थ्यांना गावाकडे जाता येते नव्हते. यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांच्याकडून दिलासा मिळाला नाही, मग आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना गावाकडे पाठविण्याचे प्रयत्न विद्यार्थी संघटनांनी सुरू केले. तर काही विद्यार्थी स्वतः वाहनांची सोय करून निघून गेले.  मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पुण्यातून सुमारे तीन हजार विद्यार्थी राज्याच्या विविध भागात गेले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातून गावाकडे गेल्याने मानसिक तणावातून सुटका होईल असे विद्यार्थ्यांन वाटले. पण ग्रामीण भागात 'कोरोना'बद्दल भीती असल्याने व सुविधा कमी असल्याने अनेकांना वाईट अनुभव आला. ग्रामपंचायतीने व्यवस्था केली नाही. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत व्यवस्था केली, पण तेथे पाणी, वीज, स्वच्छतागृह याची व्यवस्था नव्हती. काहींना शेतात मुक्काम करावा लागला. विद्यार्थ्यांना येणारे अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे गावकडे जाऊन स्वतः व घरच्यांना अडचणीत आणण्यापेक्षा पुण्यातच राहिलेेले बरे या विचाराने गावाकडे जाण्याचे विद्यार्थ्यांनी रद्द केले.
एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे अध्यक्ष महेश बडे म्हणाले, "सलग ५० दिवस विद्यार्थ्यांना जेवण पुरविल्याने व विद्यार्थी कमी झाल्याने फुड पाकिट वाटप बंद केले होते. 
पण गावाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना वाईट अनुभव आले, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून पुन्हा सुमारे ५०० जणांची व्यवस्था केली आहे."

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी विक्रम तावरे म्हणाला, "गावाकडे शाळेत क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. पण तेथे वीज, पाणी, स्वच्छता याची सोय नाही. माझ्या जिल्ह्यातील जे विद्यार्थी गावाकडे गेले त्यांना व्यवस्थीत वागणूक मिळालेली नाही. अनेकांना गावा बाहेर शेतात रहावे लागले आहे. त्यामुळे मी गावाकडे जाण्याचे रद्द केले."

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सुषमा वाघ म्हणाली, " गावाकडे जायची खुप इच्छा आहे, पण जेथे क्वारंटाईनची व्यवस्था आहे तेथे रहाणे अवघड आहे, त्यामुळे घरी जायचे रद्द केले."

पुणे होणार "स्लम फ्री सिटी'; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका राबविणार नवा प्रयोग ​

८० हजार फुड पाकिटचे वितरण
लाॅकडाऊन सुरू झाले तेव्हा सुरूवातीला २०० जणांची जेवणाची सुविधा होती, मात्र विद्यार्थ्यांची माहिती मिळत गेली तशी फुड पॅकेटची मागणी वाढली. शेवटच्या टप्प्यात रोज किमान २ हजार ३०० पर्यंत ही मागणी गेली. ५० दिवसात ८० हजार पेक्षा जास्त भरपेट जेवणाचे फुड पॅकेट वाटले होते. आता पुन्हा सेवा सुरू केला आहे, असे बडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com