Student : विद्यार्थ्यांना मिळणार पोलिसांबरोबर काम करण्याची संधी!

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र पोलिस विभागाच्या सहकार्याने ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांसाठी ‘युवा पोर्टल’द्वारे ‘विद्यार्थी पोलिस अनुभवात्मक प्रशिक्षण’ सुरू केले आहे.
Maharashtra police
Maharashtra policesakal
Published on

पुणे - तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक आहात का?, तुम्हाला पोलिस विभाग आणि पोलिसांसमवेत काम करण्याचा अनुभव हवाय का?, मग वाट कशाची पाहताहेत. विद्यार्थ्यांनो, लगेचच केंद्र सरकारच्या ‘युवा पोर्टल’ला भेट द्या आणि तुमची ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र पोलिस विभागाच्या सहकार्याने ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांसाठी ‘युवा पोर्टल’द्वारे ‘विद्यार्थी पोलिस अनुभवात्मक प्रशिक्षण’ सुरू केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पोलिस अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी ‘युवा पोर्टल’वर पाहता येणार आहेत. या अंतर्गत पोलिस अनुभवात्मक शिक्षणाची सुरुवात त्वरित होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

काय करावे लागणार?
- हे प्रशिक्षण राज्यातील सर्व विद्यापीठांमधील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले.
- कार्यक्रम अधिकाऱ्यांची नोंदणी अनिवार्य.
- ऑनलाइन नोंदणीसाठी ‘युवा पोर्टल’वर सुविधा खुली.
- महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने सर्व जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांचा संबंधित पोर्टलवर समावेश.
- सामाजिक कौशल्य, कायदेशीर नियम आणि नियमन, पोलिस तपास प्रक्रिया, कायदा आणि सुव्यवस्थेचा उपक्रमात समावेश.
- कौशल्य विकासासाठी पात्र ठरणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र मिळणार.

उद्यापर्यंत माहिती द्यावी
सर्व महाविद्यालयांतील जास्तीत जास्त स्वयंसेवकांना पोलिस अनुभवात्मक प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे आणि युवा पोर्टलद्वारे त्यांची नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांची माहिती खालील क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्ममध्ये शुक्रवारपर्यंत (ता. २०) भरावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रीय सेवा योजनेशी संलग्न सर्व महाविद्यालयांमधील प्राचार्य आणि संचालकांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com