

रुपयाच्या घसरणीमुळे डॉलर-पाउंड महागल्याने परदेशी शिक्षणाचा खर्च वाढून विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडले आहे.
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेऊन करिअरला नवी दिशा देण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर डॉलर आणि पाउंडच्या वाढत्या दराने पाणी फेरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या मूल्यात झालेली ऐतिहासिक घसरण आणि परदेशी चलनाच्या उसळीमुळे पुण्यासह देशातील मध्यमवर्गीय विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ऐनवेळी लाखो रुपयांची जादा सोय कशी करायची, या प्रश्नाने ते चिंताग्रस्त झाले आहेत.