union minister for jal shakti cr patil
sakal
खडकवासला - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरविण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन कमी करून पाणीसाठा टिकविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करून शास्त्रीय पर्याय सुचविण्याची विनंती राज्य सरकारने केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राला (सीडब्ल्यूपीआरएस) केली आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. १९) केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक होणार आहे.