राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेतील विजेत्यांचा सुभाष घई यांच्या हस्ते गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subhash Ghai

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि नव उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेत पुणे येथील डिजाईन स्किल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करत विजेतेपद पटकाविले.

राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेतील विजेत्यांचा सुभाष घई यांच्या हस्ते गौरव

कॅन्टोन्मेंट - बालकांप्रमाणे सतत काही ना काही शिकण्याची इच्छा आपल्यात पाहिजे. कितीही प्रगती केली तरी शिकण्याची भूक कायम असली पाहिजे कारण शिकणे बंद झाले तर प्रगती देखील संकुचित होऊन बसेल. कोणतेही काम करताना त्यात सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून आपण आपली कलाकृती निर्माण करा. आज प्रत्येकजण शिक्षण घेत आहे, परंतु त्यातील एकालाच पदक मिळते, कारण त्याने इतरांपेक्षा वेगळा विचार केलेला असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट शिका आणि ती गोष्ट अफलातून करा तरच यश मिळेल, असे प्रतिपादन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिलचे अध्यक्ष आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी केले.   

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि नव उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेत पुणे येथील डिजाईन स्किल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिल आणि डिजाईन स्किल अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या सर्व विजेत्यांचा गौरव सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ. आशिष कुलकर्णी (अध्यक्ष, एफआयसीसीआय. एव्हीजीसी.), मोहित सोनी (सीईओ, मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिल ), डिझाईन स्कूल अकादमीचे संस्थापक सतीश नारायणन व संचालिका श्रीदेवी सतीश, जे पी श्रॉफ, राहुल बन्सी, संतोष रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सतीश नारायणन म्हणाले, ऍनिमेशन क्षेत्रात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. पाच वर्षांपूर्वी १५% असलेली वाढ आता ४५% पर्यंत येऊन पोहोचली आहे. याशिवाय हॉलिवूड इंडस्ट्री आता ऍनिमेशनसाठी भारतीय कौशल्यांकडे आकर्षित होताना दिसून येत असल्याने या क्षेत्रात कुशल डिझाईनरची आवश्यकता आहे. हीच बाब विचारात घेऊन आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या जागतिक ऍनिमेशन स्पर्धांसाठी तयार करत आहोत जेणेकरून त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल तसेच त्यांना जागतिक पातळीवर व्यासपीठ देखील मिळेल.

डॉ. आशिष कुलकर्णी म्हणाले, ऑलिंपिक स्पर्धांमध्ये विविध खेळ असतात, परंतु कौशल्य स्पर्धेत खेळ नसून यात ग्राफिक डिझायन, अनिमॅशन, ३ डी गेम डिझाईन आदी प्रकार असतात. या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. ध्येयापासून तुम्ही कधी विचलित होऊ नका. योग पद्धतीने नियोजन केल्यास नक्की यश मिळते.

इंडिया स्किल स्पर्धेत विजयी झालेले उमेदवार

३ डी डिजिटल गेम आर्ट

१) पंकज सिंग - सुवर्ण पदक

ग्राफिक डिझाईन टेक्नोलजी

१) उत्सव सिंग - सुवर्ण पदक

२) स्टीव्हन हॉरीस - रौप्य पदक

३) वाघिशा जैन - कांस्य पदक

ज्युनिअर (१९ वर्षा खालील)

ग्राफिक डिझाईन टेक्नोलॉजी

१) किमया घोमण - कांस्य पदक

Web Title: Subhash Ghai Felicitates Winners Of National Skills Development Competition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :winnersubhash ghai
go to top