esakal | टेमघर धरणाची पाणीगळती 95 टक्के रोखण्यात यश
sakal

बोलून बातमी शोधा

Succeeded in preventing 95% leakage of water from Temghar dam

टेमघर धरणाची पाणीसाठवण क्षमता 3.81 टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा 3.71 टीएमसी एवढा आहे. या ठिकाणी साधारण तीन हजार दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास क्षमतेएवढा पाणीसाठा धरणात होईल, असे अभिप्रेत आहे. वर्ष 2016 मध्ये गळती 2 हजार 587 लिटर/सेकंद होती. सध्या पाण्याची गळती 101.4 लिटर/सेकंद इतकी आहे. म्हणजेच गळती 95 टक्के रोखण्यात आली आहे. 

टेमघर धरणाची पाणीगळती 95 टक्के रोखण्यात यश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : टेमघर धरणातून 95 टक्के पाणीगळती कमी झाली आहे. यावर्षी कोरोनामुळे गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करता आली नाहीत. ग्राऊटिंगचे 20 टक्के आणि शॉटक्रिटचे 60 टक्के काम करणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे अजून धरणातून पाच टक्के गळती आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर धरणातील गळती शंभर टक्के आटोक्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

टेमघर धरणाची पाणीसाठवण क्षमता 3.81 टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा 3.71 टीएमसी एवढा आहे. या ठिकाणी साधारण तीन हजार दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास क्षमतेएवढा पाणीसाठा धरणात होईल, असे अभिप्रेत आहे. वर्ष 2016 मध्ये गळती 2 हजार 587 लिटर/सेकंद होती. सध्या पाण्याची गळती 101.4 लिटर/सेकंद इतकी आहे. म्हणजेच गळती 95 टक्के रोखण्यात आली आहे. 

टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 हजार 494 मिलीमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा कमी आहे. साठवण क्षमतेच्या तुलनेत पाणीसाठयाची टक्केवारी 87.19 टक्के एवढी आहे. तीन हजार दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास धरण शंभर टक्के भरणार आहे. यावर्षी पडलेला एकूण पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्यामुळे आतापर्यंत धरण भरलेले नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी व्हायचे असल्यास स्वतःला सिद्ध करा - अच्युत गोडबोले 

loading image