भीमाशंकर अभयारण्यात रात्री भरकटलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Success in getting out youths  wandering in Bhimashankar Sanctuary at night ghodegaon

भीमाशंकर अभयारण्यात रात्री भरकटलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात यश

घोडेगाव - भीमाशंकर अभयारण्यात रात्रीच्या वेळी भरकटलेल्या सहा तरुणांना घोडेगाव पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल चार तासाने सुखरूप बाहेर काढले. सहा तरुण उल्हासनगर येथून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन व पर्यटनासाठी आले होते. वाटेचा व ठिकाणाचा अंदाज न आल्याने हे तरुण भीमाशंकरला येण्याचा रस्ता चुकले. रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या या तरूणांनी आपल्या मित्रा मार्फत घोडेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलीस भीमाशंकर अभयारण्यात पोचले. त्यांनी भरकटलेल्या पर्यटकांना शोधून काढले आणि भीमाशंकर येथे सुखरूप आणले.

उल्हासनगर येथील पवन अरूण प्रतापसिंग (वय २६), सर्वेश श्रीनिवास जाधव (वय २६), निरज रामराज जाधव (वय २८), दिनेश धर्मराज यादव (वय २३), हितेश श्रीनिवास यादव (वय २५), अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय २३) हे सहा तरूण श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पायी जाण्यासाठी सकाळी १० वाजता गाडीने निघाले. सकाळी ११ वाजता मुरबाड येथे आले व दुपारी १२ वाजता म्हसे गावात पोहोचले. तेथून त्यांनी भीमाशंकर अभयारण्यात पायी चालण्यास सुरूवात केली. रस्त्यावर असलेल्या पाऊलवाटेने त्यांना श्री क्षेत्र भीमाशंकरकडे असे बोर्ड दिसत होते. त्याप्रमाणे ते चालत राहिले. मात्र सध्या जोरदार पाऊस, बोचरी थंडी, धुके यामुळे जंगलात अंधार सायंकाळी पाच वाजताच पडला. यामध्ये ते रस्ता चुकले.

या तरूणांना आपण रस्ता चुकलो असल्याचे समजल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला भिमाशंकर अभयारण्यात रस्ता चुकलो असल्याची माहिती दिली. मित्राने त्वरीत घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांस माहिती दिली. माहिती मिळताच माने यांनी भिमाशंकर येथे असलेले पोलीस उपनिरक्षक अनिल चव्हाण, पोलीस हवालदार गणेश गवारी, मनीषा तुरे, तेजेस इष्टे, वृक्षाली भोर, रोहिदास गवारी यांना संबंधित रस्ता चुकलेल्या व्यक्तिंची माहिती दिली. त्यांनी लगेच ग्रामस्थ सागर मोरमारे, सुरज बुरूड यांच्या मदतीने शोधकार्य चालू केले. तर दुस-या बाजुने सहायक पोलीस निरक्षक जीवन माने, पोलीस हवालदार माणिकराव मुळूक, नामदेव ढेंगळे, स्वप्निल कानडे या दोन पथकांनी रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात सहा तरूणांना शोधण्यास सुरूवात केली.

भीमाशंकर येथे दाट धुके असल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. पुढील एक फुटावरील व्यक्तिही व्यवस्थित दिसत नव्हते. सततधार मुसळधार पाऊस अशा वातावरात डोंगर उतरून शोधकार्य सुरू झाले. चार तासांच्या प्रयत्नानंतर अथक प्रयत्नानंतर खोल दरी असलेल्या बैलघाट येथे हे तरूण मिळाले. त्यांना भीमाशंकर येथे सुखरूप आणले.

सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने म्हणाले, अत्यंत कठीण व वाईट परिस्थितीत घोडेगाव पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांनी सहा तरुणांना जंगलातून बाहेर काढले. स्थानिक परिस्थिती माहीत नसल्यास पर्यटकांनी कोणतेही धाडस करू नये. घोडेगाव पोलीस यापुढे ट्रेकिंगला जाणाऱ्या तरुणांची नोंद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे कोणती वेगळी घटना घडल्यास तातडीने संपर्क साधता येईल.

Web Title: Success In Getting Out Youths Wandering In Bhimashankar Sanctuary At Night Ghodegaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..