मोबाईल दूर ठेवून मैदानावर पळा, अभ्यास करा
सोमेश्वरनगर, ता. ५ ः शेतकऱ्याच्या आणि शेतमजुरांच्या मुलांमध्ये संकटाला सामोरे जाण्याची आणि संघर्षाची सवय जन्मापासूनच असते. तुम्ही खेळात आणि अभ्यासात शालेय जीवनातच स्वतःला शिस्त लावली आणि सातत्य ठेवले तर कुठलाही अडथळा तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही. तुम्ही मोबाइलला दूर ठेवून मैदानावर पळा आणि अभ्यासिकेत अभ्यास करा. आजची शाळेची सवय तुम्हाला थेट ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाऊ शकते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा पुणे जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.
येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने खो खो, कबड्डी, धावणे, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, बुद्धीबळ अशा विविध क्रीडा स्पर्धा तर निबंध, हस्ताक्षर, मेहंदी, वक्तृत्व अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच लकडे यांच्या हस्ते पार पडला.
अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे होते.
लकडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनातील आठवणी आणि आशियाई स्पर्धेच्या विजेतेपदाची वाटचाल सांगितली.
याप्रसंगी सोमेश्वरचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक आनंदकुमार होळकर, लक्ष्मण गोफणे, ऋषीकेश गायकवाड, शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, नानासाहेब लोणकर, शरद जगदाळे, संजय वाबळे उपस्थित होते. प्रास्ताविक पी. बी. जगताप यांनी केले. अहवाल वाचन व्ही. एन. पवार व ए. एस. सोनवणे यांनी केले. राजेंद्र झुरंगे व राणी शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप कदम यांनी आभार मानले.
सांस्कृतिक महोत्सवाला रंगत
सोमेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमास पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने रंगत वाढली. विद्यार्थ्यांनी आपल्यातील नृत्ये, नाट्य, विशेष प्रसंग अशा कला सादर केल्या. डोंबारी गीत, सैनिक गीत, तानाजी मालुसरेंच्या लढाईचा प्रसंग यास विशेष प्रतिसाद मिळाला. लावणी, कुठंच मावना हाती बी घावना, कृष्ण मुरारी, बैलगाडा शर्यत अशा नव्या गाण्यांवरील नृत्याला आणि रिमिक्सला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

