esakal | Success Story : कोथिंबीर पिकातून शेतकरी मालामाल
sakal

बोलून बातमी शोधा

 Cilantro kothimbir

Success Story : कोथिंबीर पिकातून शेतकरी मालामाल

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

म्हाळुंगे पडवळ : कळंबई (ता. आंबेगाव) येथील शेतकरी शंकर रामचंद्र कोढवळे यांनी तीन हजार कोथिंबीर जुड्या विक्रीतून ७५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. कोरोनाच्या काळात मिळालेल्या या उत्पन्नामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

आंबेगाव तालुक्‍यात चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंबई, चांडोली बुद्रूक, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेग, विठ्ठलवाडी, लौकी आदी गावे कोथिंबीर उत्पादनात अग्रेसर आहेत. हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून घोडनदी, उजवा, डावा कालवा, घोड शाखेला कालव्यात वेळोवेळी पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पंचक्रोशीतील विहिरी, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व पाझर तलावात शाश्‍वत पाणी उपलब्ध होते. नगदी पैसे मिळवून देणारी कोथिंबीर असल्याने या भागातील शेतकऱ्यांकडून कोथिंबिरीची लागवड केली जाते. परंतु, कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांनी कोथिबीरीची लागवड कमी केली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रतवारीनुसार सध्या शेकडा ५०० रुपयांपासून दोन हजार ८०० रुपयांपर्यत बाजारभाव आहे.

हेही वाचा: शेतकरी नवरा नको गं बाई; कोरोना जाईना, लग्न ठरेना!

शेतकरी शंकर रामचंद्र कोढवळे म्हणाले, ‘‘मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३३ गुंठे क्षेत्रात ३८ किलो कोथिंबीर बियाण्याची लागवड केली. बियाणे, खते, औषधे व मजुरी असा एकरी ११ हजार रुपये खर्च झाला. नारायणगाव (ता. जुन्नर) येथे बाजार समितीत पहिल्या दिवशी दोन हजार ६०० कोथिंबीर जुड्या विक्रीसाठी होत्या. त्यांना शेकडा दोन हजार ८०० रुपये बाजारभाव मिळाला. त्यानंतर ४०० कोथिंबीर जुड्यांना शेकडा दोन हजार ४०० रुपये बाजारभाव मिळाला. खर्च वजा जाता ६४ हजार रुपये उत्पन्न मिळाले.’’

हेही वाचा: अजित पवारांच्या हस्ते 'होम आयसोलेशन ऍप'चे उद्घाटन; रुग्णसेवेसाठी पुणे महापालिकेचा उपक्रम