CA Exam Success: जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथील शेतकरी कुटुंबातील ऐश्वर्या विजय बढे हिने केवळ २२व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे गावभर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खोडद : नगदवाडी (ता. जुन्नर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ऐश्वर्या विजय बढे ही सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल परिसरातून तिचे कौतुक होत आहे.