

जुन्नरच्या आदिवासी भागातील हिरा चमकला! घंगाळदरेचा रोहन तळपे महाराष्ट्र पोलीस दलात; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील घंगाळदरे येथील शेतकरी कुटुंबातील रोहन प्रदीप तळपे याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. रोहन याची धाराशिव येथे निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन दुसऱ्याच प्रयत्नात पोलिस भरतीमध्ये यश मिळविल्याबद्दल रोहन याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.