Narayangaon News: उत्तम व्यवस्थापन, पारदर्शकता व तंत्रज्ञानाच्या बळावर पराग नागरी सहकारी पतसंस्थेची झपाट्याने भरारी : वळसे पाटील

उत्तम व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार व सुयोग्य आर्थिक नियोजनाच्या बळावर पराग नागरी सहकारी पतसंस्था अल्पावधीत ठेवी, कर्जवाटप व नफ्यात भक्कम वाढ साधत सहकार क्षेत्रात विश्वासार्ह पर्याय म्हणून उदयास
सहकारात 'पराग' ब्रँडचा दबदबा! नारायणगाव शाखेचे थाटात उद्घाटन; "तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय खर्च कमी करा" - दिलीप वळसे पाटील यांचा सल्ला

सहकारात 'पराग' ब्रँडचा दबदबा! नारायणगाव शाखेचे थाटात उद्घाटन; "तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय खर्च कमी करा" - दिलीप वळसे पाटील यांचा सल्ला

Sakal

Updated on

नारायणगाव : सहकारात पराग उद्योग समूहाचा इतिहास गौरवशाली आहे. उद्योजक देवेंद्रशेठ शहा यांचा पाठिंबा असलेल्या पराग नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्तम व्यवस्थापन, व्यवहारातील पारदर्शकता, आर्थिक नियोजन यामुळे पतसंस्थेने प्रगती केली आहे. ही पतसंस्था नारायणगाव परिसरातील व्यापारी, शेतकरी यांना उत्तम सेवा देईल.असा विश्वास माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

@फोटो :

नारायणगाव (ता. जुन्नर ): पराग पतसंस्थेच्या मोबाईल ॲपचे उदघाटन माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित मान्यवर.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com