

MLS26B02949
माळशिरस ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रदीप गोरड व मान्यवर.
जिद्द, चिकाटी व कष्टातून कोणतेही यश ः गोरड
माळशिरस, ता. ९ : जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर जीवनात कोणतेही यश मिळविता येते. तसेच जीवनात शिस्तीला खूप महत्त्व असून, शिस्त अंगीकारल्यास यशस्वी होता येते, असे प्रतिपादन प्रदीप गोरड यांनी केले.
गोपाळराव देव प्रशाला व ज. च. आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधव मिरासदार, कार्याध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, कार्यवाह रामचंद्र दोशी, सहकार्यवाह राजाराम ढाले, माणिकराव वाघमोडे, बाळासाहेब सरगर, सचिन वावरे, ॲड. आपासाहेब वाघमोडे, सुरेश टेळे, रणजित मोटे, मुख्याध्यापक सूर्यकांत जानकर आदी उपस्थित होते.
सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. मुख्याध्यापक सूर्यकांत जानकर यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकांचे वाचन राहुल राजमाने यांनी केले. सूत्रसंचालन भालचंद्र काटकर यांनी केले. सुवर्णा कुलकर्णी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापिका शारदा दीक्षित, पर्यवेक्षक हनमंत बाबर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ गायनाने झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.