श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

सोमवारपासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून,२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या उत्सवात.
pune
punesakal

पुणे : सोमवारपासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून,२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या उत्सवात.श्री देवी चतुःशृंगी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे.घटस्थापना सोमवार (ता.२६) सकाळी ९ वाजता होईल व त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे.दररोज सकाळी १० व रात्री ९ वाजता, महाआरती होईल.गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण होणार आहे.मंगळवार (ता.४) रोजी दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत नवचंडी होम होणार आहे.बुधवार (ता.५) रोजी सायंकाळी ५ पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकर्‍यांचा सहभाग असेल. तसेच हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

पुजा साहित्य, लहान मुलांची खेळणी, कपडे, महिलांसाठी दागिने कपडे, गृहपयोगी वस्तु, फोटो, मसाले, खाण्यापिण्याचे पदार्थ यांच्या स्टॉलची रेलचेल सुरू आहे.भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.अनिरूद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक सेवा करणार आहेत. मंदीर परिसरात जंतुनाशके तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.

ग्रीन हिल्स ग्रुप’च्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने बारा हजार रोपे लावली असून त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणार्‍या खताची निर्मिती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून करण्यात येते. अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्‍यापर्यंत) असणार आहे. चोवीस तास सेवा’ तर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे ‘कार्डिक अ‍ॅम्ब्युलन्स’ची सोय करण्यात आली आहे. तसेच २४ तासात १८ डॉक्टर भाविकांच्या सेवेला उपस्थित असणार आहेत. औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी संपूर्ण बॅरिकेडिंगसह रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिर व परिसरात सुशोभिकरण -

मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटींचा विमा करण्यात आला आहे. यावर्षी पासून देवस्थान ट्रस्टची भाविकांनी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाईन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाइटवर भाविकांना ऑनलाइन पास उपलब्ध असणार आहेत.अशी माहिती चतुःशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com