
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ॲक्टीवा गाडीच्या टायरला अचानक आग लागल्याने गाडी जळून खाक झाली. मात्र सुदैव स्कुटीवरील तिघे बचावले. ही घटना मंगळवारी (ता. 3) सायंकाळच्या सुमारास घडली.
कुरकुंभ - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ॲक्टीवा गाडीच्या टायरला अचानक आग लागल्याने गाडी जळून खाक झाली. मात्र सुदैव स्कुटीवरील तिघे बचावले. ही घटना मंगळवारी (ता. 3) सायंकाळच्या सुमारास घडली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे - सोलापूर महामार्गावरून लातूरहून पुण्याकडे वेगात जाणाऱ्या ॲक्टीवा गाडीच्या टायरला रावणगावजवळ अचानक आग लागली. गाडीला आग लागल्याचे समजाच स्कुटीवरील दीक्षा संदिप गायकवाड ( वय 30 ), त्यांची मुलगी शेरवरी (वय 15), मुलगा रुद्रा (वय 6, मूळ रा. लातूर. सध्या रा. पुणे. ) गाडी सोडल्याने खाली पडले. त्यामुळे ते जखमी झाले. मात्र सुदैवाने तिघांचे प्राण वाचले. जखमींना पाटस टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी असणाऱ्या व्यक्तींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी जाऊन खाक झाली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
Edited By - Prashant Patil