
पुणे : धडाकेबाज पद्धतीने काम करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांची आरोग्य विभागाने अचानक बदली कुष्ठरोग व क्षयरोग विभागाच्या उपसंचालक पदावर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षेद्वारे अवघ्या दीड वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती पुणे परिमंडळाचे उपसंचालक पदावर झालेली असताना व त्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना प्रशासकीय कारण देत त्यांची बदली करण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.