

Fit Youth Addiction-Free India Campaign
esakal
पुणे : श्रीमती सुधाताई मांडके महाविद्यालय, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘नशामुक्त युवा, विकसित भारत – १०० दिवस संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सुदृढ युवा, व्यसनमुक्त युवा’ (Fit Youth, Addiction-Free Youth) या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी तरुणांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्त भारत या विषयावरील घोषवाक्य व पोस्टर निर्मिती उपक्रमाने करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर्स, प्रभावी घोषवाक्ये आणि कल्पक संदेशांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले.