esakal | ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane_Farmer

गेल्या हंगामात शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या 73 साखर कारखान्यांवर आरआरसी (वसुली प्रमाणपत्र) मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात यंदाच्या गाळप हंगामात ऊसबिलापोटी 13 हजार 508 कोटी रुपये एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देय होती. त्यापैकी 13 हजार 150 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचे प्रमाण 97 टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे.

राज्यातील साखर कारखान्यांमधील गाळप हंगाम नुकताच संपला. राज्यात यंदा 144 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. या हंगामात 550 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले.

- 'शाळा बंद पण फी भरा'; शिक्षण संस्थांनी लावला पालकांकडे तगादा!

शेतकऱ्यांकडून साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपास दिल्यानंतर 14 दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ऊस उत्पादकांना 13 हजार 508 कोटी रुपये एफआरपी देय होती. त्यापैकी 97 टक्के म्हणजेच 13 हजार 150 कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या हाती पडले आहेत. यंदाच्या हंगामात सुमारे 358 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. हे प्रमाण तीन टक्के इतके आहे. 

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार

107 कारखान्यांकडून एफआरपीची पूर्ण रक्कम : 

राज्यात यावर्षी एकूण 144 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला. त्यापैकी 107 कारखान्यांनी यावर्षी 15 जूनअखेर शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पूर्ण रक्कम अदा केली आहे. तर, 37 कारखान्यांनी 80 ते 99 टक्के रक्कम दिली आहे. गतवर्षी  195 कारखान्यांनी हंगाम घेऊनही 105 कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली होती.

मोठी बातमी : अखेर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर!​

कारखान्यांवर आरआरसी कारवाई नाही :
गेल्या हंगामात शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या 73 साखर कारखान्यांवर आरआरसी (वसुली प्रमाणपत्र) मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, यंदा बहुतांश कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिली आहे. त्यामुळे या हंगामात साखर आयुक्त कार्यालयाकडून एकाही कारखान्यावर आरआरसीची कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील वर्ष 2019 मधील गाळप हंगाम (कंसात 2020 चा हंगाम) : 
- साखर कारखाने : 195 (144)
- ऊस गाळप : 952 लाख मेट्रिक टन (550 लाख मेट्रिक टन)
- एफआरपी देय रक्कम : 23 हजार 89 कोटी रुपये (13 हजार 508 कोटी रुपये)
- थकित एफआरपी : 1171 कोटी, 5 टक्के (358 कोटी, 3 टक्के)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top