''यशवंत''च्या सभासदांचा न्यायालयीन लढ्याचा पवित्रा

''यशवंत''च्या सभासदांचा  
न्यायालयीन लढ्याचा पवित्रा
Published on: 

उरुळी कांचन, ता. ३० : थेऊर (ता. हवेली ) येथील श्रीचिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीतून मिळालेल्या रकमेतून सभासदांची ५८.६२ कोटींची थकीत देणी प्राधान्याने देण्याची मागणी जोर धरत आहे. प्रादेशिक सहसंचालकांच्या निर्देशानुसार देण्यांचे नियोजन तातडीने जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन व न्यायालयीन लढ्याचा इशारा सभासदांनी दिला आहे.
राजेंद्र चौधरी, भरत कुंजीर, लोकेश कानकाटे, सागर गोते व उत्तम दळवी यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. २०११ पासून अनेक सभासद दिवंगत झाले असून, त्यांच्या वारसांना थकीत रकमेची माहिती नाही. त्यामुळे ही माहिती कारखान्याच्या आणि प्रत्येक गटातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच, ऊस पुरवठा कालावधी, गाळप टन व दराबाबतच्या शंकांचे निरसन कारखाना कार्यालयातून व्हावे आणि देयकांचे धनादेश कार्यालयीन वेळेत वाटप करावेत, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
कारखान्याच्या वार्षिक सभेत जमीन विक्रीच्या रकमेतून बँकांची, सभासदांची आणि कामगारांची देणी देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार, पुणे येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी कारखान्यास पत्र देऊन सभासदांची देणी स्वतंत्र खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर सभासदांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आम्हाला आमच्या उसाचे बिल त्यावेळी जाहीर केलेल्या बाजारभावानेच पण दिवाळीपूर्वी द्यावे आम्हाला व्याज नको अन व्याज नको पण कारखाना सुरू झाला पाहिजे.
- राजेंद्र बबन उंद्रे, ऊस उत्पादक शेतकरी

हीच मंडळी जमीन विकू नका असे म्हणत होती मग आज का व्याजासह हिशेब मागायला पुढे सरसावली आहेत, यांना कारखाना चालू व्हावा असे वाटत नाही. आम्ही सभासद ऊस बिल देण्याबाबतची यादी प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे, मंजुरी मिळताच त्यानुसार पेमेंट दिले जाईल. - संतोष आ. कांचन, संचालक, यशवंत कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.