एफआरपीवरून संघर्ष पेटणार?

केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने एफआरपी (रास्त दर) तीन हप्त्यात देण्याची शिफारस करत राज्यांना मते मागविली होती
Sugarcane
Sugarcanesakal media

सोमेश्वरनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘८०-२०’ या सूत्रानुसार उसाची एफआरपी द्यावी, अशी भूमिका मांडली आहे, तर दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपीचा नारा बुलंद केला आहे. त्यामुळे एफआरपीवरून शेतकरी संघटना विरुद्ध राज्य सरकार, असा संघर्ष निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शाहू, संताजी घोरपडे, कुंभी, गुरूदत्त कारखान्यांनी एकरकमी एफआरपीचा निर्णय घेतल्याने अन्य कारखान्यांनाही गांभीर्याने एकरकमीचा विचार करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने एफआरपी (रास्त दर) तीन हप्त्यात देण्याची शिफारस करत राज्यांना मते मागविली होती. मात्र, महाराष्ट्राने विरोध करण्याऐवजी एफआरपीची रक्कम एक वर्ष कालावधीत तीन हप्त्यात देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, रघुनाथ पाटीलप्रणित शेतकरी संघटना, किसान सभा, शरद जोशी विचारमंच संघटना, रयत क्रांती, किसान मोर्चा अशा सगळ्याच सगळ्यांनीच राज्य सरकारवर प्रहार केले.

राजू शेट्टी यांनी राज्यभर फिरून ‘राज्य सरकारला आणि कारखान्यांना सुबुद्धी दे’ अशी आराधना केली. जयसिंगपूर येथे मंगळवारी (ता. १९) झालेल्या राज्यव्यापी साखर परिषदेत, ऊस तुटल्याबरोबर एफआरपी आणि जानेवारीपर्यंत ३३०० रुपये प्रतिटन उचल द्यावी, अशी मागणी केली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनाही चुचकारले. त्यांच्या निर्णायकी भूमिकेमुळे कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यास शेतकरी संघटना विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष पेटणे अटळ असल्याचे दिसते. दरम्यान, मागील चार-पाच वर्षात साखरेचे पान ३ वर

जिल्ह्यात कोंडी कायम

सहकारातून छत्रपती शाहू कारखान्याने २९९३ रुपये, संताजी घोरपडे कारखान्याने २९६०, दत्त शिरोळ कारखान्याने २९२०, कुंभी कासारी कारखान्याने ३०४५ रुपये प्रतिटन; तर खासगीमधून गुरूदत्त शुगर, ओलम अॅग्रो या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. त्यामुळे, ‘यांना जमते तर इतरांना का नाही?’ असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. त्यातून अन्य कारखान्यांवरही एकरकमीचा दबाव आला आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अद्यापही दराची कोंडी फुटलेली नाही. चालू आठवड्यात धुराडी पेटणार असल्याने निर्णय घ्यावा लागणार आहे.

एफआरपीवरून संघर्ष पेटणार?

भावाअभावी ‘ऐंशी-वीस’ हे सूत्र जन्माला आले. काही अपवाद वगळता याच सूत्रानुसार पहिली उचल म्हणून ऐंशी टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली होती. खासगी कारखानदारीने या सूत्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला. चालू हंगामात मात्र साखरेचे दर ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बँकेकडून मिळणाऱ्या उचलीतही वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com