

पुणे, ता. ७ : राज्यातील कारखान्यांनी उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) सादर केलेली थकीत आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यात तफावत आहे. कारखानदार शेतकऱ्यांची आणि प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. अशा कारखान्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडे शुक्रवारी केली.
‘एफआरपी’सह उसासंदर्भातील विविध प्रश्नांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने साखर आयुक्त कोलते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी ॲड. योगेश पांडे, प्रभाकर बांगर उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी थकीत रकमेची चुकीची माहिती साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली आहे. राज्य सरकारच्या दोन किंवा तीन टप्प्यातील एफआरपीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. या कारखान्यांनी विलंबाच्या कालावधीचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावे. उसाचे वजन आणि उतारा (रिकव्हरी) यामध्ये होणारी चोरी हा शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. सर्व वजनकाटे तातडीने डिजिटल आणि ऑनलाईन करणे आवश्यक आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत, असा आरोप या वेळी शेट्टी यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.