

वालचंदनगर, ता. १८ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ३८ दिवसांत तीन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर व संचालक मंडळाने दिली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ च्या गळीत हंगामास ११ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून कारखान्याने गाळपामध्ये आघाडी घेतली आहे. कारखान्याने ३८ व्या दिवशी मंगळवारी (ता. १७) तीन लाख दोन हजार ७४५ टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. आतापर्यंत कारखान्याने दोन लाख ९७ हजार ९६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. साखरेच्या उताऱ्यामध्ये (रिकव्हरी) वाढ होत असून मंगळवारी १०.५५ टक्के साखरेचा उतारा मिळाला. सरासरी उतारा ९.९७ टक्के झाला आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ४५ हजार ४०० युनिट विजेची निर्मिती केली असून यातील ८४ लाख ६३ हजार युनिट वीज महावितरणला निर्यात करण्यात आली.
सभासद व गेटकेनचे शेतकरी कारखान्याला सहकार्य करीत आहेत. सभासद व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस आपल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला देण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
06250
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.