जिल्ह्यात ९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

जिल्ह्यात ९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

Published on

साखर कारखान्याचे संग्रहित छायाचित्र वापरा

जिल्ह्यात ९२ लाख मे. टन उसाचे गाळप
विठ्ठलराव शिंदे आघाडीवर, सरासरी उतारा ८.२५ टक्के

सकाळ वृत्तसेवा
माळीनगर, ता. २ : सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांमध्ये मागील दोन महिन्यांत ९२ लाख ३१ हजार ७२८ मे. टन उसाचे गाळप होऊन ७६ लाख २० हजार ४९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.२५ टक्के आहे. गाळपात खासगी कारखानेच दादा असल्याचे दिसते. पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात आघाडीवर आहे.

चालू हंगामात राज्यात ९७ सहकारी व ९८ खासगी असे मिळून एकूण १९५ कारखाने ऊस गाळप करीत आहेत. राज्यात १ जानेवारी अखेर ५६२ लाख टन ऊस गाळप झाले असून, ४९२ लाख क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो ०.१७ टक्क्यांनी अधिक आहे.
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात चालू असलेल्या ३३ साखर कारखान्यांची एकूण दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ६१ हजार मे.टन इतकी आहे. १ जानेवारी या एका दिवसात जिल्ह्यात ८२ हजार ३८३ टन उसाचे गाळप होऊन १०.०१ टक्के साखर उताऱ्याने ८२ हजार ४२० क्विंटल साखर तयार झाली आहे. याचा अर्थ जिल्ह्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेच्या निम्मेच गाळप जिल्ह्यातील कारखान्यात होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अनेक साखर कारखान्यात पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसून येते.

पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे कारखान्यात नऊ लाख १४ हजार ७९६ टन ऊस गाळप झाले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याने सहा लाख, पांडुरंग व सहकार महर्षी कारखान्याने पाच लाख टन गाळपाचा टप्पा पार केला आहे. जयहिंद कारखान्याने चार लाख टन गाळप पूर्ण केले असून बबनरावजी शिंदे व व्ही. पी. शुगर्स हे कारखाने चार लाख टन गाळपाच्या उंबरठ्यावर आहेत. विठ्ठलराव शिंदे (करकंब), ओंकार (चांदापुरी), लोकनेते या कारखान्यात तीन लाख टन गाळप तर लोकमंगल (भंडारकवठे), सीताराम महाराज, युटोपियन कारखाने तीन लाख टन गाळपाच्या जवळपास आहेत. विठ्ठल कार्पोरेशन, सासवड माळी, सिद्धेश्वर, जकराया, भैरवनाथ (आलेगाव व लवंगी), आष्टी शुगर, आवताडे शुगर, सिद्धनाथ यांनी दोन लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला असून येडेश्वरी, श्री.शंकर हे कारखाने दोन लाख टन गाळपाच्या उंबरठ्यावर आहेत.

जिल्ह्यातील गाळपाची १ जानेवारीची स्थिती
(गाळप मे.टन,साखर क्विंटल,साखर उतारा टक्क्यांत)
कारखाने गाळप साखर उतारा
सहकारी १२ ३९,६४,४६० ३२,७८,८२५ ८.२७
खासगी २१ ५२,६७,२६७ ४३,४१,६६५ ८.२४
एकूण ३३ ९२,३१,७२८ ७६,२०,४९० ८.२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com