हर्षवर्धन पाटील यांची घोषणा
हर्षवर्धन पाटील यांची घोषणा sakal

ऊसास प्रतिटन २५०० पेक्षा ज्यादा दर देऊ; हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

Published on

इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी गाळप ऊसापोटी २१० कोटी रुपये सभासदांना दिले असून आणखी दहा ते पंधरा कोटी रुपये देण्याचे नियोजन आहे. कारखाना स्थापनेपासून आता पर्यंत कारखान्याने सभासदांना हजारो कोटी रुपये दिले असून त्यामुळे मोठे आर्थिक परिवर्तन झाले आहे. कारखान्याने यंदा १४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवले असून गाळप ऊसास २५०० हुन जास्त दर देण्याची घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर अर्बन सहकारी बँक सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, उपाध्यक्ष सत्वशील पाटील, मारुतराव वणवे, अतुल तेरखेडकर, माऊली चवरे,भाजपातालुकाध्यक्ष ऍड.शरद जामदार,शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,गटनेते कैलास कदम,शिवाजी तरंगे उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांची घोषणा
नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या चौघांना फाशीची शिक्षा

श्री.पाटील पुढे म्हणाले,कारखान्याचेसंस्थापक अध्यक्ष,दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांनी दुरदृष्ट्रीने सहकारी तत्वावर कारखान्याची निर्मिती केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळाला. मात्र काही सभासद कारखान्यास ऊस न घालता कारखान्याबद्दल अपप्रचार करतात. कार्यक्षेत्रातील एक लाख टन ऊस बाहेरच्या कारखान्यास गेला तर कारखाना, सभासदांचे दहा कोटी रुपयांचे नुकसान होते.त्यामुळे सभासदांनीकारखान्यास नोंदविलेला संपूर्ण ऊस गाळपासाठी देवून कारखान्याच्या प्रगती साठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com