काशीळ जिल्ह्यात उसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड

काशीळ जिल्ह्यात उसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड

Published on

उसाची लागण ६७ हजार हेक्टरवर

कृषी विभागाची माहिती; जिल्ह्यात सुरू हंगामातील लागवड अद्याप सुरू

काशीळ, ता. १६ : जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगामी हंगामातील ऊस लागवड पूर्ण झाली असून, सुरू हंगामातील ऊस लागवड सुरू आहे. जिल्ह्यात या तीन हंगामांतील आतापर्यंत ६७ हजार ८२२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील प्रामुख्याने कऱ्हाड, सातारा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत उसाची सर्वाधिक लागवड केली जाते. या तालुक्यात आडसाली हंगामातील ऊस लागवड होते. या लागवडी पूर्ण झाल्या आहेत. जिल्‍ह्यात एकूण ३४,६१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले. या पूर्वहंगामात २९,८६४ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सध्या हंगामातील लागवड सुरू असून, आतापर्यंत ४०२४ हेक्टरवर लागवड सुरू आहे. फेब्रुवारीअखेर हा हंगाम सुरू राहणार असल्याने या क्षेत्रात वाढ होणार आहे. सध्या सुरू असलेला गाळप हंगाम मार्चअखेर सुरू राहणार आहे. हंगाम संपल्यावर खोडवा उसाचे क्षेत्र निश्चित होणार आहे. मात्र, एकूण क्षेत्राचा अंदाज बघता एक लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपास उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
दुष्काळी पट्ट्यासह जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची कमतरता भासली नाही. यंदाही अपेक्षित पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात योजना सुरू करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवर्तने सुरू केली आहेत. त्यामुळे या भागातही पाणीटंचाई भासणार नसल्याने ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.

चौकट
----
आडसाली वाढते क्षेत्र कारखान्यांची डोकेदुखी
---------------
ऊस लवकर तुटावा, तसेच उत्पादन जास्त मिळावे, यादृष्टीने आडसाली ऊस लागवड करण्याकडे कल वाढत गेला आहे. यामुळे प्रत्येक वर्षी आडसाली क्षेत्रात वाढ होत गेली आहे. यामुळे आडसाली ऊस तोडणी नियोजन करताना कारखान्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. बहुतांश शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लागवड करत असल्याने एकाच तारखेची नोंदणी जास्त होते. यामुळे एकाच तारखेला ऊस तोडला जात नसल्याने वादावादी होत असते. क्षेत्रात वाढ झाल्याने आडसाली १८ महिन्यांहून अधिक काळ ऊस तुटला जात नसल्याने उत्पादन घट होत आहे. पुढील काळात ऊस लागवडीचे नियोजन करावे लागणार आहे. वेगवेगळ्या हंगामात ऊस लागवड होण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे लागणार आहे.

चौकट ः
------
अशी आहे तालुकानिहाय स्थिती
-----------
तालुकानिहाय आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामातील डिसेंबरअखेर ऊस लागवड (हेक्टरमध्ये) ः सातारा १५,९०३, जावळी ३९३, पाटण २१८९, कऱ्हाड १६७००, कोरेगाव ९५४४, खटाव ५३७५, माण ८३६, फलटण ११४४७, खंडाळा ३१४७, वाई ३०४२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com