

मंचर, ता. १ : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी ज्ञानेश्वर मार्तंड बांगर यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील १३० ते १४० टन ऊस पिकाचे नुकसान झाले. त्यांना तब्बल चार लाख रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना सोमवारी (ता. ३१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
पूर्ण वाढलेला ऊस असल्याने तसेच वाऱ्याची गती अधिक असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल साडेतीन तासांनी
आग आटोक्यात आली.
जळालेला ऊस १३ ते १४ महिन्यांचा असून तोडणीसाठी तयार झाला होता. ऊस तोडणीचा कालावधी जवळ आला असतानाच आग लागल्याने बांगर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संबंधित यंत्रणांनी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी माजी सरपंच राजेश ज्ञानेश्वर बांगर यांनी केली आहे.
दरम्यान, ऊस पिकाच्या वरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना घडत आहेत. वीजवाहिन्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेताच्या बाजूने घेण्याची व्यवस्था केल्यास अनेक शेतकऱ्यांचे ऊस पीक सुरक्षित राहू शकते, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितले.
16474
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.