उसाची हेक्‍टरी उत्पादकता २५० टनांवर नेणार

Sugarcane
Sugarcane

पुणे - साखर उद्योगाकडून उसाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ७० टनांवरून २५० टनांहून अधिक वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसह कृषी विद्यापीठांकडून संशोधन आणि साखर उद्योगाकडून एकत्रितपणे ऊस उत्पादकता वाढीसाठी विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. त्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात अन्नधान्याची वाढती गरज पाहता उसाचे क्षेत्र वाढविणे अशक्‍य आहे. त्याऐवजी हेक्‍टरी उत्पादकता वाढविण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने साखर कारखान्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील अशोक चौगुले यांनी व्हीएसआय-०८००५ जातीच्या उसाचे हेक्‍टरी २५५ टन उत्पादन घेतले.

करवीर तालुक्‍यातील नारायण वरुटे यांनी एमएस-१०००१ या उसाच्या जातीचे हेक्‍टरी २२८ टन उत्पादन घेतले. तर, पंढरपूर तालुक्‍यातील शेतकरी हणमंत बागल यांनी कोएम-०२६५ जातीचे हेक्‍टरी ३१५ टन उत्पादन घेतले. परंतु, सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे शक्‍य होत नाही. उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाच्या पारंपरिक ऊस संकर आणि जैवतंत्रज्ञानाद्वारे ऊसपिकातील अजैविक ताणनियंत्रणावर संशोधन करण्यात येत आहे.

त्यावर बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताणनियंत्रण संस्था, कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, खत व्यवस्थापनावर आंतरराष्ट्रीय मृदा संघटना काम करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com