

पान १६
----------
उसाला अंतिम दर
३८५० रुपये द्या
शेतकरी संघटना; शरद जोशी जयंतीनिमित्त बैठकीत चर्चा
अॅग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः गत हंगामातील उसाला प्रतिटन ३८५० रुपये अंतिम दर मिळावा. इथेनॉलसह साखरेला चांगला दर मिळत असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील अधिक रिकव्हरी असलेल्या कारखान्यांना गुजरातच्या धर्तीवर दर देणे शक्य आहे. यासाठी सर्व कारखान्यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला.
शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक झाली. प्रारंभी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सहकार आघाडीचे संजय कोले म्हणाले, ‘‘गत हंगामात दिलेल्या उसाला प्रतिटन ३८५० रुपयांप्रमाणे अंतिम दर मिळावा. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना गुजरातप्रमाणे दर देणे शक्य आहे.’’
सातारचे बाळासाहेब चव्हाण म्हणाले, ‘‘इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना ऊस दर मिळण्यास मदत होत आहे.’’ संजय गायकवाड म्हणाले, ‘‘सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी निम्म्या दराने पाणीपट्टी, घरपट्टी वसूल केली. त्यावेळी ऊसबिले, सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरीची विक्री न झालेल्यांना सवलतीचा फायदा घेता आला नाही.’’
शीतल राजोबा म्हणाले, ‘‘सांगली कृषी बाजार समितीचे विभाजन व्हायलाच हवे. त्याशिवाय जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांच्या बाजार समित्या स्वयंभू होणार नाहीत.’’
बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा साखर कारखान्याने २५४ कोटींचे नवे कर्ज उचलले आहे. एवढ्या पैशात दोन नवे कारखाने तयार होतात.’’ ‘शक्तिपीठ’ला आमचा विरोध असून शेतकऱ्यांना २४ तास वीज द्यावी, अशीही मागणी यावेळी केली.
वसंत भिसे, बाशेखान मुजावर, किरण मगदूम, शंकर कापसे, बाबा पाटणे, नवनाथ पोळ, ईश्वर कणसे, सचिन गवळी, एकनाथ कापसे, किशोर मगदूम, मोहन परमणे, प्रशांत मालगावे, चारू बिरनाळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.