

ऊसदराच्या मागणीसाठी
चार वाहने पेटवली
दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने शेतकरी आक्रमक
मिरज (जि.सांगली), ता. २६ ः ऊसाला पहिली उचल प्रतिटन साडेचार हजार रुपये मिळावी, या मागणीवरून सांगली जिल्ह्यात ऊसदराचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. आरग, लक्ष्मीवाडी परिसरात चार वाहने पेटवली. आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या उसाची वाहतूक करणारे ऊसाने भरलेले ट्रॅक्टर मल्लेवाडी-आरग रस्त्यावर पेटवून देण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या हंगामासाठी उसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये प्रतिटन देण्याची मागणी केली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर न करताच कारखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक होत असून, आरग येथील घटनेमुळे ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भोसे परिसरात रविवारी श्री दत्त इंडियाची शंभरभर वाहने आडवण्यात आली होती. संघटनेचे संदीप राजोबा यांनी सांगितले की, धरणांमध्ये ८५ टक्के पाणीसाठा असतानाही नद्या कोरड्या पडल्या असून, नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे. दुसरीकडे, ऊस वाळण्याची भीती दाखवून शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी भाग पाडले जात आहे, अशा आरोप केला. सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर दुहेरी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.
चार-पाच दिवस थांबण्याचे आवाहन
ऊसदराची कोंडी पुढील चार ते पाच दिवसांत फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईने ऊसतोड करून घेऊ नये. चार ते पाच दिवस थांबल्याने ऊस वाळणार नाही, असे आवाहन संघटनेचे संदीप राजोबा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.