जिल्हाधिकारी कार्यालय बातमी

जिल्हाधिकारी कार्यालय बातमी
Published on: 

ऊस दराच्या प्रश्नावर आज बैठक
प्रतिटन ५ हजार रुपयांची मागणी
अहिल्यानगर, ता. ४ ः ऊस गाळप हंगाम २०२६-२७ सुरू करण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी (ता.५) दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य साखर आयुक्त यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला शेतकरी प्रतिनिधी, साखर सहसंचालक, पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेष लेखापरीक्षक तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर उपस्थित राहणार आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर करावा. अन्यथा ऊस पिकाला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान देऊनच साखर कारखाने सुरू करावेत, अशी मागणी शिवसेना नेते अभिजित पोटे यांनी केली आहे. कमी पर्जन्यमानामुळे यंदा अनेक भागांत ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू केल्यास अपरिपक्व ऊस कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उतारा कमी होऊन शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. थंडीच्या कालावधीत उसाची वाढ तसेच साखर तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होत असल्याने २०२६-२७ चा गाळप हंगाम नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

इन्फो
ऊस दर, साखर उतारा व वाहतूक खर्चावर चर्चा

सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात काही कारखान्यांनी नियमांचे उल्लंघन करून जास्तीचा वाहतूक खर्च दाखविल्याने तसेच साखर उतारा कमी दाखविल्यामुळे ऊस उत्पादकांना कमी दर मिळाल्याचा आरोप पोटे यांनी केला आहे. या तांत्रिक बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com