

ऊसदर जाहीर करण्यासाठी मंगळवारी
नेवासा फाटा येथे रास्ता रोको अंदोलन
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर, ः साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होऊन महिना उलटून गेला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही साखर कारखान्याने ऊसाचा दर जाहीर केला नाही. साखर कारखानदार केवळ शेतकऱ्यांची दिशाभुल करत आहेत. साखर कारखान्यांनी ऊसाला दर जाहीर करावा यासाठी मंगळवारी (ता. १०) छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावर नेवासा फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राज्य कार्यकारीनी सदस्य अंकुश काळे यांनी सांगितले.
अंकुश काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. साखर कारखाने बिनधास्तपणे ऊसाचे गाळप करत आहेत. मात्र दरवर्षीप्रमाणे ऊसदर जाहीर करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी अल्प पाण्यावर ऊस जगवला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ऊसाला किमान पाच हजार रुपये प्रती टन दर मिळणे गरजेचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखानदार मात्र मुग गिळून गप्प आहेत. कारखानदारांनी ऊसाला तातडीने दर जाहीर केला नाही तर मंगळवारी (ता. १०) छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावर नेवासा फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको होणार असल्याचे काळे म्हणाले. यावेळी सुरज शेटे व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.