

PNE26W58782
सोलापूर : ऊसदरप्रश्नी सोलापूर-विजयपूर महामार्गावर नांदणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करताना शेतकरी.
---
उसाला पाच हजार रुपये
दरासाठी शेतकरी आक्रमक
नांदणीत ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. १५) नांदणी येथे सोलापूर-विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ‘उसाला पाच हजार रुपये दर दिलाच पाहिजे,’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी मागणीसाठी आवाज उठविला. दर मिळेपर्यंत साखर कारखान्यांना ऊस देऊ नका, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणि उत्पादनाला मिळणारा मोबदला या पार्श्वभूमीवर प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी रणदिवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या हक्काच्या दरासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनावेळी अख्तरताज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, मोहसीन पटेल, इकबाल मुजावर, चिदानंद पाटील, श्रीशैल पाटील, मल्लाप्पा पाटील, मल्लिकार्जुन नरोणी, बिळेणी सुंटे, विजय कुलकर्णी, विजय हजारे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.