

‘स्वराज’कडून ३,९११ रुपये उच्चांक दर
शरयू, श्रीदत्त इंडियाकडून ३,९१०, तर ‘श्रीराम’ची ३,८०० रुपयांची उचल
फलटण, ता. १७ : यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसदराच्या बाबतीत फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा पाहायला मिळत आहे. स्वराज ग्रीन पॉवरने प्रतिटन तीन हजार ९११ रुपयांची पहिली उचल जाहीर केली असून, हा सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक उच्चांकी दर ठरला आहे.
फलटण तालुक्यात सर्वप्रथम कापशी येथील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडने ऊसदराची कोंडी फोडली. या कारखान्याने प्रतिटन तीन हजार ९१० रुपयांची पहिली उचल जाहीर केली. त्यानंतर साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखान्यानेही प्रतिटन तीन हजार ९१० रुपयांची पहिली उचल जाहीर केली. श्रीराम सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन तीन हजार ८०० रुपयांची उचल जाहीर केली आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे फलटण तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी १९ नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करावा, असा अल्टिमेटम दिला होता. मुदतीत दर जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर अल्टिमेटमची मुदत संपण्यापूर्वीच स्वराज ग्रीन पॉवरने प्रतिटन तीन हजार ९११ रुपये दर जाहीर केला. पहिल्या उचलीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्वराज ग्रीन पॉवरने जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर केल्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊसदराची चर्चा अधिक रंगली आहे.
----------------------------------
कोट
कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे फलटण तालुक्यातही ऊसदर जाहीर झाल्याने ऊस उत्पादक कष्टकरी शेतकऱ्यांना समाधानकारक न्याय मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघटनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला यश आले असून, हा निर्णय शेतकरी एकजुटीचा विजय आहे.
-धनंजय महामुलकर
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.