खोडव्यास प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त अनुदान

खोडव्यास प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त अनुदान

Published on

सोमेश्वरनगर, ता. ५ : ‘‘यंदाचा हंगाम बंद होईपर्यंत तुटणाऱ्या उसाचा खोडवा ठेवल्यास आगामी गाळप हंगामात खोडव्यास प्रतिटन शंभर रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल,’’ अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. आगामी गाळप हंगामात (२०२६-२७) जे शेतकरी हार्वेस्टरद्वारे (ऊस तोडणी यंत्र) ऊसतोड करू देतील त्या सर्वांना प्रतिटन पन्नास रुपये अनुदानही दिले जाणार आहे.

सोमेश्वर कारखाना प्रतिदिन साडेसात हजार टन क्षमतेचा असला तरी उच्च तांत्रिक क्षमतेमुळे ९५०० टन प्रतिदिन क्षमतेने चालत आहे. त्यामुळे दीडशे दिवस कारखाना चालण्यासाठी चौदा लाख टन उसाची आवश्यकता आहे. चालू साखर हंगामात सर्व कारखान्यांना ऊस टंचाई असली तरी सोमेश्वर कारखाना साडेतेरा लाख टनांचे उद्दिष्ट गाठणार आहे. आगामी हंगामाचाही संचालक मंडळाने विचार सुरू केला आहे. आगामी हंगामासाठी अठरा हजार एकर इतका समाधानकारक आडसाली ऊस उपलब्ध आहे. खोडव्याचे प्रमाण मात्र अकरा ते बारा हजार एकर अपेक्षित असताना आठ ते नऊ हजार एकरच राहण्याची शक्यता आहे. खोडवा उशिरा तुटणे आणि वजनात घट येणे अशी दोन प्रमुख कारणे शेतकऱ्यांकडून समोर येत होती. यावर उपाय म्हणून चालू हंगामाप्रमाणेच आगामी हंगामातही १५ डिसेंबरपासूनच खोडवा उसाची तोड सुरू केली जाणार आहे. त्यामुळे खोडवा वेळेत तुटणार आहे. शिवाय हार्वेस्टरने खोडवा किंवा कुठल्याही प्रकारच्या उसाची तोड केल्यास प्रतिटन पन्नास रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, सध्या १६ फेब्रुवारीपासून पुढे तुटणाऱ्या उसाच्या खोडव्यालाही गाळपाला आल्यावर शंभर रुपये अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली.

रोप लागवडीस मुदतवाढ
ऊस लागवडीस २८ फेब्रुवारीपर्यंत परवानगी असते. परंतु अधिकची ऊस उपलब्धता व्हावी यासाठी चालू लागवड हंगामात ३१ मार्चपर्यंत रोप पद्धतीची ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच ताग व धैंचा या पिकांचे बियाणे सभासदांना पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती शेती अधिकारी बापूराव गायकवाड, विराज निंबाळकर यांनी दिली.

चालू हंगामात गाळप हंगाम.........२०२०-२१.........२०२१-२२.........२०२२-२३.........२०२३-२४.........२०२४-२५ .........२०२५-२६
उपलब्ध ऊस.........११४९८.........१२१५९.........१२७०६.........१४७४९.........१२००३.........१२०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com