धोकादायक ऊस वाहतुकीला ‘सेफ्टी ब्रेक’

धोकादायक ऊस वाहतुकीला ‘सेफ्टी ब्रेक’
Published on

पुणे, ता. ८ : गाळप हंगाम सुरू झाला की ग्रामीण रस्त्यांपासून महामार्गांपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढते. रात्री रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभे असलेले रिफ्लेक्टरविना ट्रेलर आणि बैलगाड्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यात क्षमतेपेक्षा अधिक भरलेला ऊस, एकापेक्षा अधिक ट्रेलर जोडून तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून वाहतूक होते. यामुळे धोका आणखी वाढतो. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामापूर्वी अशा ऊस वाहतुकीला सुरक्षिततेचा ‘ब्रेक’ लावण्याची तयारी साखर आयुक्तालयाने केली आहे.
ऊस वाहतुकीतील अपघात रोखण्याची जबाबदारी केवळ चालकांवर न टाकता साखर कारखान्यांनाही त्यात सहभागी करण्यात आले आहे. ट्रॅक्टरचे ट्रेलर, बैलगाडी आणि ट्रक यांना रिफ्लेक्टर बोर्ड आणि रिफ्लेक्टिव्ह टेप सर्व भागांवर योग्य प्रकारचे रिफ्लेक्टर असणे साखर आयुक्त कार्यालयाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने अनेकदा रात्रीच्या वेळी रस्त्यावर असतात. काही वेळा ट्रेलर रस्त्याच्या कडेला उभे केले जातात. अशा वेळी रिफ्लेक्टर नसल्यास मागून येणाऱ्या वाहनचालकांना समोर नेमके काय आहे, याचा अंदाज येत नाही. जवळ आल्यानंतर वाहन दिसल्याने अचानक ब्रेक लावावा लागतो. मात्र वेग आणि थांबण्याचे अंतर यांचा मेळ न बसल्यास मागून धडक होण्याची शक्यता असते.

कारखान्यांना सूचना
- सलग वाहतूक आणि अपुरी विश्रांती यामुळे बैलांच्या आरोग्यावर परिणाम
- क्षमतेपेक्षा अधिक वजन लादू नये, त्यांना क्रूरतेने पळवू नये
- आजारी किंवा जखमी जनावरांकडून वाहतूक करून घेऊ नये
- तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास दुपारी बारा ते तीन या वेळेत बैलांना विश्रांती द्यावी

सेवा रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना
महामार्गालगत सेवा रस्ता उपलब्ध असल्यास ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी त्याचा वापर करावा. सेवा रस्ता नसलेल्या ठिकाणी महामार्गावरून वाहतूक करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे. शेतातून मुख्य रस्त्यावर येताना इतर वाहनांचा अंदाज घेणे, रस्त्याच्या कडेला वाहने उभी न करणे आणि वाहनांच्या ट्रॉलीच्या बाहेर ऊस न भरणे, याबाबतही चालकांचे प्रबोधन करण्याच्या सूचना आहेत.

रिफ्लेक्टरविना वाहने, एकापेक्षा अधिक ट्रेलर, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे नसणे, चुकीचे ओव्हरटेकिंग आणि क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरणे यामुळे अपघात होऊ शकतात. बैलांवर क्षमतेपेक्षा अधिक वजन लादू नये; आजारी, जखमी, कुपोषित आणि जास्त वयाच्या बैलांना विश्रांती द्यावी.
- डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com