
पुणे - दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या लोकप्रिय गाण्यांसह त्यांच्याविषयीचे काही अपरिचित किस्से ऐकत रफी यांचा जीवनप्रवास पुणेकर रसिकांसमोर उलगडणार आहे. निमित्त आहे, सकाळ माध्यम समूह, ‘फर्माईशे’ आणि ‘तेज ॲडव्हर्टायझिंग’ यांच्यातर्फे आयोजित ‘सुहाना समा विथ अन्नू कपूर’ या कार्यक्रमाचे.