

Suhana Swasthyam 2025
Sakal
देशातील बहुतांश नागरिक पाकीटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील ‘एक्स्पायरी डेट’ आणि ‘एमआरपी’ पाहतात. ‘एक्स्पायरी’ लांबच्या तारखेचे असलेले पाकीट घेण्यावर ते भर देतात. परंतु, ‘एक्स्पायरी डेट’ जितकी लांबच्या तारखेची तितका तो पाकीटबंद पदार्थ घातक असतो. नागरिकांनी पाकीटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना आकर्षक ‘पॅकेजिंग’ला भुलून न जाता त्यातील घटक पदार्थ व त्यांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक होणे गरजेचे आहे. या जागृतीसाठीच मी परदेशातून परत येत भारतीयांना ‘आरोग्य साक्षर’ करण्याचा निर्णय घेतला.