येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने बराकीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना गुरुवारी दुपारीच्या सुमारास घडली.
Yerwada Central Jail
Yerwada Central Jail sakal
Summary

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने बराकीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना गुरुवारी दुपारीच्या सुमारास घडली.

पुणे - खुनाच्या गुन्ह्यात (Murder Case) जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने (Prisoner) बराकीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. हि घटना गुरुवारी दुपारीच्या सुमारास घडली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

गणेश जगन्नाथ तांबे (वय 53) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे याने 2010 मध्ये एका व्यक्तीचा खुन केल्याच्या आरोपावरुन त्याच्याविरुद्ध विराल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात न्यायालयाने तांबे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. प्रारंभी काही काळ तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात होता, त्यानंतर 4 मे 2019 रोजी त्याची रवानगी येरवडा खुल्या कारागृहात करण्यात आली होती. तो या विभागात विविध प्रकारची कामे करीत होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तांबे खुल्या कारागृहातच त्यास सांगितलेले काम करीत होता. त्यानंतर दुपारी तो त्या बराकीमध्ये गेला. त्यानंतर त्याने बराकीतील खिळ्याला नाडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच कारागृहातील पोलिस अधिकारी व डॉक्‍टर तत्काळ बराकीमध्ये पोचले. डॉक्‍टारांनी त्याची तपासणी केली, तेव्हा त्यास मृत घोषीत केले होते. कारागृहात शिक्षा भोगत असताना आलेल्या नैराश्‍यातुन त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.काही दिवसांपूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्यानेही आत्महत्या केली होती. तसेच एका पोलिस कर्मचाऱ्यानेही बंदुकीतुन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com