

फोटो ः सुजित उबाळे
सुजित उबाळेची शतकी खेळी
पुणे, ता. १३ ः पुणे क्रिकेट अकादमी आणि सागर कांबळे आयोजित आठव्या अभिषेक ठाकूर स्मृती करंडक’ खुल्या गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत सुजित उबाळेच्या (१०१) शतकाच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्लबने स्केल-अप ‘ब’ संघाचा १५७ धावांनी पराभव केला.
येवलेवाडी येथील ब्रिलियंट अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट क्लबने सात बाद २६२ धावा केल्या. त्यात प्रमुख वाटा सुजित उबाळेने केलेल्या शतकाचा होता. त्याने ४१ चेंडूत आठ चौकार आणि दहा षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. त्याला विश्वास कुमारने ४८ धावांची तर प्रसन्न पवारने ४७ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. प्रथमेश जिरवाणकरने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना स्केल-अप ‘ब’ अकादमीला ८ बाद १०५ धावा करता आल्या. कुलदीप नायडूने तीन तर अनिल डोमकावळेने दोन गडी बाद केले. ‘सामन्याचा मानकरी’ हा मान सुजित उबाळेने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
ब्रेव्हहार्ट क्लब - (२० षटकांत) ७ बाद २६२ (सुजित उबाळे १०१, विश्वास कुमार ४८, प्रसन्न पवार ४७, शुभम मोहिते ३६, प्रथमेश जिरवाणकर २-२८) विजयी विरुद्ध स्केल-अप ‘ब’ अकादमी - (२० षटकांत) ८ बाद १०५ (आशिष कांजणे २५, सनी पाटील २५, श्रीनिवास पाटील नाबाद २१, कुलदीप नायडू ३-१३, अनिल डोमकावळे २-२८).
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.