जैन मुनि प्रवचन

जैन मुनि प्रवचन
Published on: 

सुखात हुरळू नका, दुःखात खचू नका
जीवनातील सुख-दुःख तात्पुरते असल्याने प्रत्येक परिस्थितीत समतोल राखणे महत्त्वाचे आहे. सुखात हुरळून जाऊ नका, दुःखात विव्हळू नका. पुण्योदय आणि पापोदयाचा जीवनावर प्रभाव असतो. आत्मकल्याण, कर्मनिर्जरा आणि पुण्यप्राप्तीसाठी धर्मध्यान व आराधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य अक्षयश्री म. सा. यांनी केले. आरोग्यासाठी आहार-विहाराकडे लक्ष द्यावे. संस्था किंवा परिवारप्रमुखांनी डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून वागावे. मोठ्या पदावरील व्यक्तीने शांत चित्ताने प्रत्येक परिस्थिती कौशल्याने हाताळावी. जीवनात ‘ये भी नहीं रहेगा’ अर्थात ‘हेही दिवस जातील’ हा विचार कायम स्मरणात ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
-----------------------------
शाश्वत सुख मोक्षातच
संसारातील भौतिक सुख क्षणिक, नाशवंत आणि अपूर्ण आहे. शाश्वत, अक्षय आणि पूर्ण सुख केवळ मोक्षातच आहे. त्यामुळे आठ कर्मांचा क्षय करून मोक्षप्राप्ती हेच साधकाने परम लक्ष्य ठेवावे आणि त्यासाठी सिद्ध पदाची आराधना करावी, असे प्रतिपादन मुनिश्री प्रशांतरत्न विजय यांनी केले. अरिहंत पद हे परोपकाराचे, तर सिद्ध पद शाश्वत सुखाचे भांडार आहे. सिद्ध भगवंत अनंत सुखाचा अनुभव घेत शाश्वत सिद्धगतीत विराजमान असतात. सिद्ध पदाची साधना न केल्याने जीवात्मे अनंतकाळापासून चार गतींच्या चक्रात अडकले आहेत. या चक्रातून मुक्त होण्यासाठी साधना आवश्यक आहे. सर्व कर्मांचा क्षय करून मोक्षाचे परम लक्ष्य गाठता येते, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com