महिलेचा खुन करुन पसार झालेल्या सुखाबिंदाला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरुन उत्तर प्रदेशामध्ये पलायन करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली.

महिलेचा खुन करुन पसार झालेल्या सुखाबिंदाला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक

कात्रज/पुणे - महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरुन उत्तर प्रदेशामध्ये पलायन करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रोख व सहा तोळे, आठ ग्रॅम वजनाचे दागिने चोरुन नेले. आरोपीला 21 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुखाबिंदा ऊर्फ बादल उर्फ सुग्गा बनवारी बिंदा (वय 27, दुबावल, प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर पारूबाई किसन सावंत (वय 65, रा. मेनका स्टोन कंपनी, भिलारेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सावंत यांचे भाऊ शहाजी चंदनशिवे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पारुबाई सावंत या 11 जुलै रोजी त्यांच्या घरात एकट्या होत्या. त्यावेळी बादल बिंद याने त्यांच्या घरात शिरुन त्यांचा गळा दाबून खुन केला होता. यावेळी त्याने घरातील रोकड आणि त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेले होते. त्याच दिवसापासून आरोपी सुखाबिंदा फरार झाला होता.

पोलिसांनी त्याच्यावर संशयीत म्हणून गुन्हा दाखल केला होता. सुखाबिंदा याचा शोध घेत असताना तो उत्तरप्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलिस कर्मचारी धनाजी धोत्रे, राहुल तांबे, आशिष गायकवाड यांचे पथक उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे गेले. तेथून त्यांनी 15 जुलै रोजी सुखाबिंदा यास अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यास पुण्याला आणून न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यास 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव करीत आहेत.

'सुखाबिंदा याने पारुबाई सावंत यांचा खुन केल्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या शेजाऱ्यांना त्यास विचारणा केल्यानंतर त्याने आपण वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर जात असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी तो खुन करुन पळाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा माग काढून त्यास अटक केली.'

- जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.

Web Title: Sukhabinda Murdering A Woman Arrested Prayagraj In Uttar Pradesh Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..